सादिक थैम :-वरोरा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या टेमूर्डा ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या गैरकारभार व मनमानी पणामुळे गावाकऱ्यान मध्ये संतापाची लाट पसरली आहे. तालुक्यातील टेमूर्डा ग्रामपंचायत ही मोठी व भरपूर उत्पन्न देणारी ग्रामपंचायत असून. येथील ग्रामविकास अधिकारी पी. एल. बोरचाटे व सरपंच सौ. सुचिता ठाकरे हे ग्रामपंचायत सदस्यांचे काहीही न ऐकता व विश्वासात न घेता आपल्या स्वामीर्जीतील सदस्यांना घेऊन व ठेकेदारांना घेऊन मोठ्या प्रमाणात अनधिकृत पणे कामे करत असल्याचे आढळून येत आहे.
ग्रा. प. टेमुर्डा कार्यालयाकडून कुटल्याही अधिकृत निविधा (Tender) न काढता ग्रा.वि.अ.टेमुर्डा व सरपंचा यांचे संयुक्त पनाने संपूर्ण आर्थिक व्यवहार व संबंधित कामे स्वतः ग्राम पंचायत, टेमुर्डा करीत आहे. ग्रा. प. टेमुर्डा मध्ये संबंधित कामे करीत असतांना वाढीव लेबर दाखवून नमुना १९ मध्ये जास्तीच्या हेजेरी पट दाखवून निधीची परस्पर उचल केल्या गेली आहे.व अंदाजपत्रका नुसार लागणाऱ्या साहित्याची वाढीव बिले जोडल्या गेली आहे.तसेच मासिक सभेमध्ये अनेकदा खर्च नामंजूर करण्यात आलेले ठराव प्रोसेडींगला घेतल्या जात नाही व याबाबत ग्रा. वि. अ. यांना विचारणा केली असतांना सभागृहामध्ये आम्हा सन्माननीय सदस्यांना आकसापोटी हेतू पुरस्परपणे उद्धट, असभ्य व एकेरी भाषेत शब्दे बोलून आम्हाला अपमानित केल्या गेले आहे. यांच्या कार्यालयात झालेल्या संभाषणात हात -वारे करून आवाज चढवून उन्माद्यणे बोलून अपमानीत केल्या गेल्याचा मोबाईल मध्ये चित्रीकरण करून पुरावा उपलब्ध आहे. तसेच Proseding जेव्हा च्या तेव्हा न लिहिता सदस्यांना विश्वासात न घेता केवळ उपस्थिती म्हणून सही घेऊन मासिक सभेत झालेल्या विषयांची Proseding ला नोंद न घेता आपले मर्जीने ठराव लिहून जमा खर्चास मंजुरी देऊन अधिकची बिले काढली गेली आहे.
सदर ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची विभागीय चौकशी करून योग्य ती कारवाही करण्यात यावी व मुजोर ग्रामविकास अधिकारी यांची तात्काळ हाकल्पट्टी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्री मयूर राजू विरुटकर व इतर ग्रा. पं सदस्य यांनी केली.सदर ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाही न झाल्यास ग्रामपंचायत ला कुलूप ठोकून ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी आंदोलनाचा ईशारा दिलेला आहे.
0 comments:
Post a Comment