राजुरा, ता.प्र. -राजुरा तालुक्यातील धोपताळा कामगार वसाहतीत राहणा-या देबटवार परिवारात आरोप - प्रत्यारोप सुरू असून त्यामुळे मुलांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे. आपल्याला दारू पिऊन बेदम मारहाण करून मानसिक त्रास देऊन आपला संसार उध्वस्त केला आहे. आपला प्रेमविवाह झाल्यानंतर आपल्या परिश्रमाने पतीला उच्च स्तरावर पोहचविल्याचे सांगून या अन्यायाविरोधात पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रश्मी राजेश्वर देबटवार यांनी दिनांक 25 जून रोजी राजुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. Domestic Violence
पती राजेश्वर देबटवार यांनी अत्यंत खोटे व निराधार आरोप केले असून मला गेल्या अनेक वर्षापासून पती आणि त्यांच्या परिवाराने सतत त्रास दिला. प्रेमविवाह झाल्यानंतर स्वत: मेहनत करून पतीला शिकविले आणि नौकरीसाठी प्रयत्न केले. मात्र 18 वर्षानंतर माझेवर संशय घेऊन मला व मुलांना अमानुष मारहाण केली, अखेर एक वर्षापूर्वी माहेरी निघून गेली. मात्र मुलांच्या शिक्षणाचा विचार करून परत येथे आली असता किराणा घेऊन देण्याची मागणी केल्यावर पतीने धोपटाळा काॅलनी व वेकोलिच्या उपक्षेत्रिय कार्यालयाजवळ आपल्याला व मुलांना मारहाण केली. या घटनेची राजुरा पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी पती राजेश्वर देबटवार, दीर महेश, सासू लिला व जाऊ निता या देबटवार परिवाराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. राजुरा पोलिसांना माहिती देऊन काॅर्टरवरून माझे सर्व सामान व दोन दुचाकी गाड्या घेऊन माहेरी गेल्याचे सांगीतले. वेकोलित कार्यरत आपल्या पतीच्या बदलीत आपला कसलाही हात नसून आपल्याला कुणाचाही आधार नाही. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी मला संघर्ष करावा लागत असून आपल्याला साथ द्यावी, अशी विनंती रश्मी राजेश्वर देबटवार यांनी केली. पत्रकार परिषदेत महिलेची तिन्ही मुले उपस्थित होती.
0 comments:
Post a Comment