राजुरा २६ जुन:- गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रिय महामार्गाचे काम सूरू आहे. महाराष्ट्र ते तेलंगाना दोन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गाच्या कामामुळे गावकऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
National highway hits villagers.
वरूर रोड गावाला लागून सूरू असलेल्या महामार्गाच्या कामात मोठया प्रमाणात माती टाकण्यात आली. रस्ता बांधकामाचे योग्य नियोजन नसल्याने व रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे पाणी, सांडपाणी जाण्यास मार्ग नाही. गावकऱ्यांनी सामूहिक आक्रोश आंदोलन केल्यानंतर तहसीलदार यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सांडपाण्याचा योग्य निचरा व्यवस्थापन करून देण्याविषयी राष्ट्रिय महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. परंतु तहसीलदार यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून गावकऱ्यांच्या जीविताशी, आरोग्याशी खेळ खेळत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग अधिकर्यांविषयी गावकऱ्यांत तीव्र रोष दिसत आहे. तहसीलदार व गावकऱ्यांच्या समोर सांडपाणी वाहून जाईल असे कामं करण्याचे आश्वासन देणाऱ्या महामार्ग अधिकाऱ्यांना आश्वासनांचा विसर पडला आहे. चिखलात पडून एखादी दुर्घटना घडल्यास व दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्यास उद्भविणाऱ्या आरोग्यविषयक समस्या याला राष्ट्रिय महामार्ग अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी गावकरी करीत आहे. ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी व गावकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते आहे.
0 comments:
Post a Comment