सादिक थैम वरोरा: पोलीस स्टेशन वरोरा येथे दिनांक २४/०६/२०२५ रोजी रात्री २२.०० वाजता मिळालेल्या माहिती प्रमाणे गोवंश कार्यवाही करण्यात आली पोलीस स्टेशन वरोरा ठाणेदार श्री. अजिक्य तांबडे साहेब, सपोनी भस्मे साहेब, पोहवा पवार, पोहवा, किशोर बोंळे यांनी स्थानीक लोंकाचे मदतिने नित बैल, गोवंश घेवुन जानारे पिकअप वाहना क. एम.ए.४८ ए.जी. ३१७४ ची पंचासमक्ष झडती घेतली असता
Cow slaughter proceedings at Warora police station, seizure of property worth Rs. 2,60,000
सदर वाहनामध्ये अवैध्य रित्या, निर्दयतने तिन बैल एकुन किंमत ६०,००० रुपयाचा मुददेमाल मिळुन आला तो जप्ती करुन सदरचे बैल गोरक्षण वरोरा येथे दाखल करण्यात आले तसेच पिकअप वाहना क. एम.ए.४८ ए.जी. ३१७४ ची कि.२००००० रुपयाचे जप्ती करण्यात आले. एक अल्पवयीन मुलगा याला न्याय मंडळा संमक्ष हजर केले तसेच आरोपी प्रणय दामोधर चावरे रा. बोडखा ता. बोडखा जि. चंद्रपुर यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असता वि. न्यायालयाने आरोपीची करागृहात रवानगी करण्यात आली आहे.सदरची कारवाई मा. श्री. पोलिस अधिक्षक सा., चंद्रपूर, मा. अप्पर पोलिस अधिक्षक मॅडम चंद्रपूर, मा. नयोमी साटम मॅडम, सहायक पोलिस अधिक्षक तथा पोलिस उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनामध्ये पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सहायक पोलिस निरीक्षक शरद भस्मे, पोहवा पवार, पोहवा, किशोर बोंळे आदी यांनी केली.
0 comments:
Post a Comment