सादिक थैम तालुका प्रतिनिधी
वरोरा:स्वच्छता निरीक्षक हे एक महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य पद समजल्या जाते.समाजाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी महत्त्वाचे पद आहे.
Bhushan Salvatkar transferred to Ballarpur
वरोरा नगर परिषदेतील उत्तम सेवा देणारे स्वच्छता निरीक्षक भूषण सालवटकर हे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत. त्यांच्या कामाचा उद्देश नेहमी समाजात स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हाच होता.
वरोरा सारख्या शहरात आपल्या कामाने लोकप्रिय झालेल्या भूषण सालवटकर यांची बदली नुकतीच बल्लारपूर येथे झाली.यामुळे वरोरा वासीय एका चांगल्या कर्मचाऱ्यास मुकल्याची भावना वरोरा वासियांमध्ये निर्माण झाली आहे.
पहाटे पाच वाजेपासून आपल्या कार्यावर हजर असणारे सालवटकर हे उत्तम नियोजन करण्यात तरबेज समजले जात. कोणताही कार्यक्रम चांगला कसा करता येईल यावर त्यांचा नेहमीच नियोजनात भर असे.
आपल्या कार्यावर हजर झाल्यानंतर गल्लोगल्ली स्वतः फेरफटका मारत व स्वच्छतेची कुठे गरज आहे हे पाहून कामाला प्राधान्य देत.
कोरोना काळात त्यांनी महामारीने मृत्यू पावलेल्या अनेक नागरिकांच्या पार्थिवावरअंतिम संस्कार केले. शहरात कुठे ही मोकाट जनावरे,मांजर,बैल,कुत्रा यासारखे प्राणी दगावले तर नागरिक त्यांना संपर्क करत. नागरिकांच्या आलेल्या भ्रमणध्वनीवर त्वरित कारवाई करण्यास ते प्राधान्य देत.
वरोरा नगर परिषदेमध्ये 22 फरवरी 2004 मध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून रुजू झालेले भूषण सालवटकर यांनी शहरात 21 वर्ष आपली सेवा दिली. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ते नागरिकात व अधिकाऱ्यात प्रिय झाले होते. अशा या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची बदली बल्लारपूर येथे झाल्याने येथील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
0 comments:
Post a Comment