Ads

जिल्हाधिकारी ऑनफिल्ड

सादिक थैम वरोरा: राज्य शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना फिल्डवर जाऊन विकास कामांच्या प्रगतीचा आढावा तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ३ जून रोज बुधवारला वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांना भेट देऊन सदर कामांची पाहणी केली.
Collector on field
पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी गौडा यांनी विकास कामांच्या प्रगतीचे टप्पे व अडचणीबाबत अधिकारी व नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात येत असलेले महिला बचत गटाच्या वस्तू विक्री शॉपिंग मॉलला भेट दिली.
तालुक्यातील सालोरी,येन्सा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या रेशीम उत्पादन व मलबेरी प्लांटेशन केंद्र, कॅम्पा निधीतून वन विभागद्वारे टेमुर्डा येथे राबविण्यात येणारे चारा गवत विकास प्रकल्प, वरोरा नगर परिषद व अंबुजा फाउंडेशन यांच्याद्वारे करण्यात येत असलेल्या शहरातील गांधी सागर तलाव खोलीकरण कामाची पाहणी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिका-यांसोबत उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, कनिष्ठ अभियंता खणके, वन परिक्षेत्र अधिकारी सतिश शेंडे, मंडळ कृषी अधिकारी काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment