चंद्रपूर :२३४ कोटी रूपयांची अमृत-१ व २७० कोटी रूपयांची अमृत-२ पाणीपुरवठा योजना, ५०६ कोटी रूपयांची अमृत मलनिस्सारण योजना तसेच शहरात विविध ठिकाणी फाउंटेन लावणे, रामाळा तलाव पुनर्जीवन व सौंदर्यीकरण,१०० कोटी रूपयांचे कचरा संकलन व वाहतुकीचे काम, मालमत्ता कर मुल्यांकन प्रसिद्धीचे कंत्राट, कोरोना काळात भोजन पुरविणे, मालमत्तेचे फेर मुल्यांकन अशा कोट्यावधी रुपयांच्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार मनपाचे माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव यांना केली होती.
Corrupt municipal official promoted...
चंद्रपूर महानगरपालिकेत आतापर्यंत झालेल्या सर्व घोटाळ्यांना तसेच भ्रष्ट आयुक्त विपिन पालीवाल यांना मंत्रालयातील नगर विकास विभागाचे संरक्षण असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.भ्रष्ट आयुक्त पालीवाल यांना पदोन्नतीचे बक्षीस देणाऱ्या नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे देशमुख यांनी लेखी तक्रार केली.
आमदार सुधाकर अडबाले 'हक्कभंग' प्रस्ताव मांडणार
माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपातील भ्रष्टाचाराबाबत नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांना पत्र दिले होते. आमदार अडबाले यांनी 12 जुलै 2024 रोजी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन मनपातील सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र आजपावेतो प्रधान सचिव कार्यालयाने या प्रकरणाबाबत आमदार अडबाले यांना कोणतीही माहिती पुरविली नाही.त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार व चंद्रपूर मनपा तसेच नगर विकास विभागाच्या सर्व भ्रष्ट अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्याकरिता पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार अडबाले यांनी माजी नगरसेवक देशमुख यांच्याशी चर्चा करतांना दिले.
0 comments:
Post a Comment