भद्रावती जावेद शेख - दिनांक २७/०६/२०२५ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चंदनखेडा येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रकल्प कार्यालयाचे मा. श्री. अशोक बेलेकर (सहा, प्रकल्प अधिकारी शिक्षण) व अध्यक्ष म्हणून मा. श्री. नयनजी जांभुळे, सरपंच ग्रा. पं. चंदनखेडा हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून श्री. मनोहर हनवते, अध्यक्ष तंटामुक्ती समिती, श्री. समिरजी पठाण, पोलीस पाटील चंदनखेडा, श्री. निलेश वैदय, कार्यकारी अभियंता, श्री रामटेके, ग्राम विस्तार अधिकारी चंदनखेडा, श्री विनोद धरत, सौ, भारती ताई ठरकांडे, उपसरपंच ग्रा. प. चंदनखेडा, श्री सोनोणे, मुख्याध्यापक आश्रम शाळा चंदनखेडा, तसेच शाळेतील अधिक्षक, अधिक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विदयार्थी उपस्थित होते.
Grand entrance ceremony organized at Chandankheda Ashram School
सर्वप्रथम उपस्थित सर्व विदयाध्यर्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. नवागत विदयार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. बेलगाडी बसवून बैंड वाजे ने लेझिम च्या सादरीकरणाने विदयाथ्यांची प्रभारी फेरी काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांना मंचावर स्थानापन्न करण्यात आले. पाहुण्यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
प्रवेशोत्सव कार्यक्रम दरम्यान खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
१. नवीन प्रवेशीत विदयाथ्यांचे स्वागत तथा संपूर्ण विदयार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण
२. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
३. दहावी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण पहिले पाच विदयार्थ्याच्या पालकांचे व विदयार्थ्यांचे शॉल श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आले
४. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम
५. आदिवासी सांस्कृतिक वेशभुषा, नृत्य स्पर्धा, विविध स्पर्धांचे आयोजन
मा. श्री. अशोक बेलेकर, सहा. प्रकल्प अधिकारी यांचे मनोगत :-
विदयार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी, त्यांचे नवीन शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी पासून शाळेत मन लागावे याकरीता प्रकल्पातील संपूर्ण शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विदयार्थी हा कोणत्याही परिस्थतीत अभ्यासात मागे राहता कामा नये या करीता पालकांनी विदयार्थ्यांना छोटया छोटया सणा करीता गावाला नेवू नये. असे आवाहन उपस्थित पालकांना केले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या नंतर शाळेत मध्ये माहिती केंद्र स्थापन करण्यात आले असून सर्व योजनांचे फार्म व माहिती ही शाळेत उपलब्ध असेल त्या करीता आदिवासी बांधवाना प्रकल्प कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही असेही सांगितले.
श्री नयनजी जांभुळे, सरपंच चंदनखेडा यांचे मनोगत
शाळेतील प्रवेशात्सवाचे आयोजन करण्यात आले असे सांगितले तसेच विदयार्थ्यांना नवीन प्रवेशोत्सव संदर्भात शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील कोणत्याही समस्या प्रकर्षाने सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
श्री. समिरजी पठाण, पोलीस पाटील चंदनखेडा यांचे मनोगत-
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे योग्य व नियोजनपूर्ण कार्यक्रमाचे आयोतन केल्याबददल शाळेचे मुख्याध्यापक श्रो सोनोणे सर तसचे संपूर्ण शाळेतील कर्मचारी यांचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री सोनोणे, मुख्याध्यापक यांचे मनोगत -
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चंदनखेडा येथे उपस्थित सर्व पाहूणे, पालक व विदयार्थी यांचे स्वागत केले. शाळेतील शैक्षणिक वातावरणात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते कडे विशेष लक्ष दिले जाईल असे पालकांना आश्वासन दिले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही इयत्ता १० वी चा निकाल उत्कृष्ट पणे लावण्याकरीता सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले या शैक्षणिक सत्रात सुदधा शाळेत भविष्यवेधी शिक्षण, ब्रॉयटर माईड, इंग्लीश स्पिकींग, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, अश्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेत सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल. पालकांनी विदयार्थ्यांना सणासुदीला स्वगावी नेवू नये, त्यामुळे विदयार्थ्यांची अभ्यासाची गोडी कमी होते असेही आवाहन पालकांना केले.
अश्याप्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थित सर्व पाहुणे, पालक, विदयार्थी, कर्मचारी यांच्या नाश्ता, चहा व भोजनाची सोय शाळेत करण्यात आलेली होती. कार्यक्रमाचे संचालन श्री भोयर सर व आभार प्रदर्शन श्री सोनुले सर यांनी केले. अतिशय आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पाडण्यात आला.
0 comments:
Post a Comment