राजुरा २९ जुन:-
नवजिवन शिक्षण प्रसारक मंडळ वीरुर (स्टे.) तालुका राजुरा रजि. नं. एफ - २४१३(चं) या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांचे अर्ज क्र.६४/२०२५ कलम ४१(अ) दिनांक ९/०४/२०२५ रोजी पारित आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. खुशाल खोब्रागडे यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात दिनांक २९ जुन २०२५ रोजी इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय विरूर (स्टे.) येथे निवडणूक पार पडली.
The triennial election of Navajivan Shikshan Prasarak Mandal, Virur (St.) has been completed.
संस्थेच्या एकूण दहा सभासदांपैकी सात सभासदांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. त्यात कार्यकारी मंडळ बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली. सतिश कोमरवेल्लीवार, अध्यक्ष, रामदास गिरटकर, सचिव, खुशाल कोडापे, उपाध्यक्ष, हरिदास वानखेडे, सहसचिव, गुलाबराव ताकसांडे, कोषाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य श्रीमती प्रभाताई कोमरवेल्लीवार, श्रीमती खाजाबानो बशीर अहमद यांची निवड झाली. सतीश कोमरवेल्लीवार हे भारतीय जनता पार्टीचे राजुरा तालुका उपाध्यक्ष आहेत. तर रामदास गिरटकर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
0 comments:
Post a Comment