सचिन पाटील प्रतिनिधी:-
प्रतिवर्षी प्रमाणे रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशनच्या विद्यमाने छत्रपती शाहू महाराज जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी निमित्ताने स्थानिक यंग रेस्टॉरंट हॉल येथे दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
Perseverance and consistency are the keys to success.
या प्रसंगी एडिंगबर्ग येथे शिक्षण घेत असलेले जय भारत चौधरी यांनी विदेशातील विविध शिक्षणासाठी असलेले अभ्यासक्रम आणि विविध संस्था यांच्या शिष्यवृती व विविध विषयात असलेली विद्यार्थांसाठीची संधी या बद्दल मार्गदर्शन केले आणि नवनियुक्त न्यायाधीश आशिष बोरकर यांनी विद्यार्थ्यांना विधी विभागातील असलेल्या संधी सोबत संविधानातील कलमांबाबत सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे असे सांगितले या प्रसंगी विधीतज्ञ अँड. आशिष मुंधडा, विद्यापीठ सिनेट सदस्य प्राध्यापक नीलेश बेलखेडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.शिल्पा टिपले,तसेच इजिं. आनंद तेलंग यांनी आपले स्वानुभव सांगून जिद्द चिकाटी आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. राजस प्रविण खोब्रागडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभ्यासासोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आव्हान केले. विशेष सत्कार म्हणून हर्षल नेवलकर, चैतन्य धकाते, मीठ वानधरे, डॉ. श्रेयस घुबङे, ह्यानी विविध क्षेत्रात नाव अधोरेखित केल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कोमल बोरकर , प्रास्ताविक प्रज्योत बोरकर व आभार हर्षल खोब्रागडे यांनी केले. यासोबतच रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशन चे साक्षी वाघमारे, पोषणा बेताल, संचिता उराडे, चारिका भगत, युगांन धवले, प्रशिल झोडापे, अक्षय डांगे, निवेदिता पुणवटकर, यश खैरकर, साहिल जूनघरे,सुरभी मोडक, नयन अलोणे, शुभम शेंडे, कपिल गणवीर, श्रेयस निमगडे, पल्लवी गेडाम, उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment