Ads

गुरुकुंज मोझरी येथे मध्यवर्ती प्रतिनिधी म्हणून मोहनदास मेश्राम व मारोती सातपुते यांची नियुक्ती

राजुरा :- राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी, जि. अमरावती या संस्थेच्या मध्यवर्ती प्रतिनिधी म्हणून मोहनदास मेश्राम व मारोती सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली व त्याना नियुक्ती बाबतचे पत्र देण्यात आले आहे.
Mohandas Meshram and Maroti Satpute appointed as central representatives at Gurukunj Mozari
श्रीगुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुराचे सेवाधिकारी मोहनदास मेश्राम व उपतालुका सेवाधिकारी मारोती सातपुते यांचे राजुरा तालुक्यातील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्य तसेच ग्रामीण भागातील गावा-गावात जाऊन राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रचार-प्रसार करणे व गुरुदेव सेवा मंडळाचे निर्वाचन करणे, राष्ट्रसंतांच्या कार्याची जनजागृती करून राष्ट्रसंतांचे छोटे-मोठे कार्यक्रम घेऊन त्यांचे विचार घराघरात पोहोचावे तसेच बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन करून बालकांना सुसंस्कारचे धडे देणे, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्याची माहिती देणे इत्यादी कार्य यासाठी त्यांची नित्यनियमाने धडपड चालू आहे. तेव्हा त्यांच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी या संस्थेच्या मध्यवर्ती प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल तालुक्यातील सर्व गुरुदेव उपासक, उपासिका कडून यांचे कौतूक होत असून सदर राष्ट्रसंतांच्या कार्याला अधिक गतिमान करतील अशी सेवाधारी मंडळीला अपेक्षा आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment