सादिक थैम वरोरा:माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथे ८ जून पासून बेमुदत अन्नत्त्याग आंदोलन चालू आहे .आंदोलनाचा आज ६ वा दिवस असून सुद्धा सरकार ने आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून वरोडा तालुक्यातील शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी बच्चू भाऊच्या आंदोलनाच्या समर्थनात टेमुर्डा येथील मार्केट लाईन दोन तास बंद करून सरकार चा निषेध करत बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
महायुती सरकार ने निवडणूकीच्या आधी आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. परंतु आज निवडणूक होऊन ६ महिने लोटून सुद्धा हे सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करू शकले नाही. त्यांना भूलथापा देत आहे असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.
आमच्या मागण्या मान्य कराव्या. बच्चू कडूची तब्बेत दिवसेंदिवस बिघडत असल्याने सरकार ने आमचा अंत पाहू नये. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून सरकार ला सळो की पळो करून सोडू असा इशारा शेतकऱ्यांनी सरकार ला दिला आहे.
या आंदोलनात किशोर डुकरे, आशिष रणदिवे,गणेश उराडे,लक्ष्मण आसुटकर, संदीप वासेकर, तुळशीराम आगलावे, सुधाकर डुकरे,अभय आसुटकर,अमोल ढेकणे,उमेष भोंग,दादू तिखट,अशोक भोंग,अरुण डोये, आदी. व्यापारी, दुकानदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते या आंदोलनादरम्यान भारत माता की जय, जय जवान जय किसान, बच्चूभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, दिव्यांगणा 6 हजार मानधन मिळालेच पाहिजे अश्या घोषणबाजी शेतकऱ्यां कडून देण्यात येत होत्या.
0 comments:
Post a Comment