Ads

विद्युत अल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या 3 आरोपींना धाबा पोलिसांनी केले अटक

चंद्रपुर :-उप पो.स्टे. धाबा हदृदीतील मौजा गोडंपिपरी ते टोमटा येथे ११ के.व्ही. टोमटा एरिकेशन विदयुत लाईन गेलेली असुन सदर विदयुत पोलवरील अॅल्युमिनीयम तार दिनांक २९/०७/२०२५ रोजी रात्री ००.०० ते ०३.०० वा दरम्यान कोणतीरी अज्ञात चोराने ३०० मीटर डॉग कंडक्टर किंमत ७० /- रू मिटर प्रमाणे एकुण किंमत २१,००० /- ची तार तोडुन चोरून नेल्याबाबत उप पोस्टे धाबा येथे फिर्यादी न साईनाथ अशोक लांडे वय २९ वर्षे व्यवसाय नौकरी (कनिष्ठ अभियंता धाबा महावितरण) रा. धाबा यांचे तक्रारीवरून अप क्र.४५/२०२५ कलम ३०३ (२) बी. एन. एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
Dhaba police arrest 3 accused for stealing electrical aluminum wire
धाबा पोलीसांनी गुन्हयात संशयित विपुल कुळमेथे, संदेश कोवे, निलेश सातपुते यांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयासंबधीत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केले व त्यांच्याकडून गुन्हयातील चोरीस गेलेली ०४ नग विद्युत तार किंमत २१,००० /- रूपये तसेच गुन्हयात वापरलेली बजाज पल्सर मोटर सायकल क्रमांक एम.एच. ३४ सी एच ५३९१ किंमत ७०,००० /- रूपये असा एकुण ९१,००० चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास धाबा पोलीस करीत आहे.

सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात सपोनि धर्मेन्द्र मडावी ठाणेदार उप पोस्टे धाबा यांचे नेतृत्वात पोहवा विजय मडावी, पोअ / श्रवण कुत्तरमारे, अमोल कुळमेथे, पोअ/गजानन तुरेकर, चापोहवा / चंद्रशेखर आसुटकर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment