चंद्रपूर:- शहरातील जुनोना रस्त्यावरील विठ्ठुबाबा मंदिर संकुलात बुधवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भावांमध्ये झालेल्या वादात लहान भावाने मोठ्या भावाची गोळ्या घालून हत्या केली. मृताचे नाव बुद्दा सिंग टाक आहे, तो जुनोना येथील रहिवासी आहे, तर आरोपीचे नाव सोनू सिंग टाक असल्याचे सांगण्यात येत आहे.Murder
Younger brother shot and killed older brother
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दोन्ही भावांमध्ये कशावरून तरी वाद झाला. वाद वाढताच धाकट्या भावाने मोठ्या भावावर देशी बनावटीच्या पिस्तूलने गोळी झाडून त्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मृत आणि आरोपीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडेच आरोपी सोनू सिंग टाकविरुद्ध जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कटकाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल कचोरे, रामनगरचे पोलिस निरीक्षक आसिफ राजा यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि घटनेचा तपास करत आहेत.
0 comments:
Post a Comment