(प्रशांत गेडाम)सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाच्या महसूलविभागामार्फत दिनांक 01 ऑगस्ट 2025 ते 07 ऑगस्ट 2025 या कालावधीत 'महसूल सप्ताह' साजरा करण्यात येणार असून, सिंदेवाही तालुक्यातही याचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले आहे.
तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, महसूल सप्ताहाचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
01 ऑगस्ट 2025:- महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहाची सुरुवात होईल.
02 ऑगस्ट 2025:- शासकीय जमिनीवरील रहिवास प्रयोजनार्थ अतिक्रमण नियमित करून पट्टे वाटप करण्यात येतील.
03 ऑगस्ट 2025:- पांदण व शिवार रस्त्याची मोजणी करून सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिफारस करण्यात येईल.
04 ऑगस्ट 2025:- छत्रपती शिवाजी महाराज गौरव अभियानांतर्गत मंडळ निहाय शिबिरांचे आयोजन करून विविध योजनांचा लाभ दिला जाईल.
05 ऑगस्ट 2025:- विशेष सहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना / इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना) योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) करण्यात येणार.
06 ऑगस्ट 2025:- शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित केली जातील.
07 ऑगस्ट 2025:- 'एम-सँड धोरणाची अंमलबजावणी' करून महसूल सप्ताहाचा समारोप होईल.
तहसीलदार संदीप पानमंद यांनी सिंदेवाही तालुक्यातील सर्व जनतेला या महसूल सप्ताहाचा जास्तीत जास्त लाभघेण्याचे आवाहन केले आहे.
0 comments:
Post a Comment