Ads

इन्फंट येथे ' सखी सावित्री' समितीचे गठन.

राजुरा (ता.प्र) :-इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे शाळास्तर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले. यावेळी या समितीमार्फत नवनियुक्त केलेल्या सर्व सदस्याचे समितीच्या सचिवामार्फत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
Formation of 'Sakhi Savitri' committee at Infant.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले त्यात शालेय स्तरावर ही समिती स्थापन करण्याचा उद्देश, मुलींच्या सुरक्षेबाबत कायदे याबाबतची माहिती राजुरा पोलिस विभागातील पीएसआय सुवर्णा काळे यांनी दिली. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती डॉक्टर रोहिणी डोर्लीकर यांनी दिली. शाळेतील मुलींना या समितीच्या मार्फत समुपदेशनाचे कार्य ॲड.अंजली गुंडावार यांनी केले. अल्का सदावर्ते यांनी आपले आद्यगुरु कोण याबाबतची माहिती सांगितली तसेच निशा पांढरे यांनी तर मुलींनी आपले ध्येय पूर्ण करताना खचून न जाता परत ते पूर्ण करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा आलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी , सहा. शिक्षक सुभाष पिंपळकर, विजय डोंगरे, रामकली शुक्ला , धरती नक्षीने, रीना कोरी, प्रज्ञा कांबळे , मेघा धोटे, नसीम शेख यासह इयत्ता ८ ते १० वी मधील विद्यार्थिनी उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांनी केले. सूत्रसंचालन ममता पुरटकर यांनी तर आभार प्रदर्शन विद्या चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment