Ads

चंदनखेडा येथे राणी हिराई प्रभाग संघाचे अधिवेशनात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व कॅडर यांचा गौरव

जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती :-उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती भद्रावती अंतर्गत राणी हिराई प्रभागाचे वार्षिक अधिवेशन दिनांक २३/७/२०२५ रोजी कृषी सभागृह चंदनखेडा येथे उषा रमेश शेंडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
At the convention of Rani Hirai Ward Sangh at Chandankheda, the organizations and cadres who did excellent work were felicitated.
त्यावेळी मंचावर प्रामुख्याने डॉ.बंडू आकनुरवार, सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती भद्रावती, सरपंच नयन जांभूळे,तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी, तालुका व्यवस्थापक रजनी खोब्रागडे,उपसरपंच भारती शरद उरकांडे, महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर फुलझेले, सीडीसीसी चे मॅनेजर बुरान, प्रभाग संघ पदाधिकारी शेवंता प्रशांत गजबे,मनीषा विलास सोयाम ,प्रभाग समन्वयक हर्षा नागतूरे, अरविंद तांदुळकर दिनेश उईके, डीआरपी विशाखा मुन उपस्थित होते.
प्रास्ताविकातून हर्षा नागतुरे यांनी अधिवेशनाचे महत्व व स्वरूप याविषयी माहिती दिली. श्वेता संजय भोयर लिपिका यांनी अधिवेशनामध्ये सन २०२४- २५ या वर्षातील जमा खर्च, वार्षिक अहवाल, पुढील वर्षातील नियोजन सादर केले. अधिवेशनात प्रसंगी उत्कृष्ट काम करणारे विकास ग्रामसंघ मुधोली,सहेली ग्रामसंघ पारोधी, प्रगती धान उत्पादक संघ चोरा,अश्विनी धारणे लिपिका वडाळा तु.यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी उमेद अभियानाच्या कामात वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत चंदनखेडा यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.बंडू आकनुरवार यांनी उपस्थित महिला व कॅडर यांचे केलेल्या कामाबाबत कौतुक केले. भविष्यात उमेद अंतर्गत सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवावे असे आवाहन केले. सरपंच नयन जांभूळे यांनी प्रभाग संघाचे कामात ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी लागणारे सहकार्य दिले जाईल असे आश्वासित केले. बँक मॅनेजर फुलझेले व बुरान यांनी बँक कर्ज, वापर व परतफेड याबाबत मार्गदर्शन केले. तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी यांनी अभियान कामाची प्रगती, असलेल्या कमतरता व भविष्यकालीन उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. अधिवेशन प्रसंगी दुर्गा अरविंद कारमेंघे यांनी कॅडर ते यशस्वी उद्योजिका प्रवास, वर्षा अनिल नन्नावरे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला त्या विषयाची यशोगाथा अधिवेशनात मांडली. कार्यक्रमाचे संचालन प्रभाग संघ व्यवस्थापक स्वाती प्रमोद राखुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बँक सखी शुभांगी मिलिंद पांढरे यांनी केलेसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभागातील ग्राम संघाचे पदाधिकारी व कॅडर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment