Ads

तहसीलदार साहेब जरा लक्ष द्या!

राजुरा २४ जुलै :-
दिनांक २३ जुलै रोजी नाईकनगर गावात नाल्याचा पूर आला आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या घरात पुराचे पाणी घुसून नुकसान झाले. flood water in houses
Tehsildar Saheb, please pay attention!
पावसाळा सुरू झाला की नाईकनगरसाठी हा पुराचा धोका आता नेहमीच्याच भीषण वास्तवात बदलला आहे.गावापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर बांधलेला बंधारा ही या आपत्तीचं मूळ कारण ठरत आहे. नाल्यातील कचरा आणि पाणी बंधाऱ्यावर अडतं आणि उलट गावात शिरत. दरवर्षी गावकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. घरातलं अन्न, कपडे, भांडी, सर्व काही वारंवार पाण्यात वाहून जातं. आजारीपणाचं सावट वाढतं आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात.गावकऱ्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, निवेदनं दिली, पण प्रशासनाने आजवर कायमस्वरूपी उपाययोजना केलेल्या नाहीत. गावातील महिलांचा आवाज आजही वेदनेने दाटलेला आहे. दरवर्षी पावसाळा येतोय याची भीती वाटते. रात्र झोप लागत नाही. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी घाबरून जावं लागतं. संसार उद्ध्वस्त होतो.शासन प्रशासनाने आमच्या वेदना एकदातरी समजून घ्याव्यात. अशी भावना तेथील गावकरी व्यक्त करीत आहे.

गावकऱ्यांची मागणी......
हा बंधारा तातडीने पाडून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करावा.
नुकसानभरपाई नको, कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.पूरग्रस्तांसाठी पक्क्या घरकुलांची तातडीने मंजुरी द्यावी. दरवर्षी होणाऱ्या या पुरामुळे नाईकनगर गावकरी आता संतापलेले आणि हताश झाले आहेत . लवकरात लवकर तहसीलदार साहेबानी निर्णय घ्यावा अशी मागणी बंजारा टायगर युवा संघटना चे प्रमोद राठोड, शिवकुमार आडे,श्रीकांत आडे,लखन चव्हाण,अभिषेक राठोड,आकाश आदे,कृष्णा जाधव,अनीश राठोड,भूषण राठोड,आशुतोष जाधव,पंकज राठोड,संदीप पवार,प्रफुल्ल जाधव,कुणाल शेंडे,उमेश चव्हाण,आदित्य चौधरी व इतर गावकऱ्यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment