Ads

१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

चंद्रपुर :-तब्बल १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ११ सदस्य संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर ३ संचालक भाजप पुरस्कृत आहेत. या निवडणुकीसाठी आमदार किर्तिकुमार भांगडिया आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रभावी रणनिती आखली होती. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत आता भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
BJP dominates the District Central Bank elections held after 13 years
या विजयानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात सर्व नवनियुक्त संचालकांचा आमदार जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गांधी चौक येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मागील १३ वर्षांपासून रखडली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. काँग्रेसचे दीर्घकाळ वर्चस्व असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत यंदा भाजपने सर्व ताकद पणाला लावत, आपल्या विचारसरणीच्या उमेदवारांना रिंगणात उतरवले. या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आमदार भांगडिया आणि आमदार जोरगेवार यांनी काटेकोर नियोजन करत रणनीती आखली होती.
काल (१० जुलै) रोजी मतदान पार पडल्यानंतर आज (११ जुलै) निकाल जाहीर झाला. यात भारतीय जनता पक्षाचे सुदर्शन निमकर, संजय डोंगरे, नंदा अल्लूरवार, गजानन पाथोडे, यशवंत दिघारे, उल्हास करपे, प्रा. डॉ. ललित मोटघरे, आवेश पठाण, गणेश तर्वेकर, रोहित बोमावार, निशिकांत बोरकर, हे उमेदवार संचालक म्हणून विजयी झाले आहेत.
या यशानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. सर्व नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला असून, या विजयामुळे जिल्हा बँकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्हा बँकेची 100 वर्षांपूर्वी कै.धनंजयराव गाडगीळ यांचे प्रेरणेतून कै. श्रीराम जाणी,बाबा आमटे ,जा.या.पाटील, श्रीधर पद्मावार, केशवराव नाकाडे या सारख्या श्रद्धेय मान्यवरांनी स्थापना केली होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारास फार मोठा ईतिहास आहे. ही निवडणूक सोपी नव्हती. दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत भाजपच्या विचारसरणीची मुहूर्तमेढ रोवायची होती. त्यासाठी आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. आपल्याला आता या बँकेच्या कारभारात पारदर्शकता आणायची आहे, शेतकरी, कामगार, छोटे उद्योजक आणि सर्वसामान्य सदस्य यांना न्याय द्यायचा आहे. बँकेचा विकास, अर्थसहाय्य योजना, कर्ज वितरणात पारदर्शकता आणि गरीब, वंचित घटकांसाठी अर्थसहाय्य या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करणार आहोत असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रकाश देवतळे, मनोहर पाहूनकर, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राजू पाटील झाडे, आमीन धामण्णी यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील सहकार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे सहकार्य लाभले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment