राजुरा :-माथरा येथील पोलीस पाटील सुरेश हिरामन चहारे यांनी ग्रामपंचायत, खामोना अंतर्गत माथरा गावांतील नाली बांधकामात अडथळा निर्माण केल्याबद्दल वैयक्तिक स्वार्थासाठी पदाचा गैरवापर केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी यांनी 23 जुलै 2025 च्या आदेशानुसार पोलीस पाटील सुरेश चहारे यांना एक वर्षासाठी निलंबित केले आहे.
Mathara Police Patil Suresh Chahare suspended for a year
माथरा ग्रामपंचायत अंतर्गत सुभाष सिंगमवार यांचे घरापासून ते मारोती धोटे यांच्या घरापर्यंत बांधकाम वे. को.ली. सी.एस.आर. फंडातुन सिमेंट कॉन्क्रेट नालीचे बांधकाम मंजुर करण्यात आले होते. सदर नालीचे बांधकामाला पोलीस पाटील सुरेश चहारे अडथळा निर्माण केला.
माथरा गावातील नालीचे बांधकाम करावयाचे असल्यामुळे खामोना ग्रामपंचायत ने नोटरी/रजिस्ट्री नुसार जागेची मोजणी करुन आपली जागा ताब्यात घेवुन उर्वरीत शासकिय जागेवरील केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे याबाबत अनेकदा नोटीस देण्यात आली होती. मात्र सचिव/सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी प्लॉटची मोजणी करण्यास आले असता त्यास विरोध केला. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात आली होती.
खामोना ग्रामपंचायत चे सचिव/सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी त्यांचेशी आरेरावीची भाषा वापरणे व शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, गावांतील शांतता व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअन्वये कर्तव्यात दुर्लक्ष करून कसूर केल्याचा ठपका ठेवीत विभागीय अधिकारी यांनी पोलीस पाटील पदाचा केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 9 (ड) अन्वये एक वर्ष मुदतीपर्यंत माथराचे पोलीस पाटील सुरेश चहारे यांना पदाच्या सेवेतून निलंबीत केले आहे.
0 comments:
Post a Comment