Ads

भद्रावतीतील भाजी मार्केटमधील दुर्दशा; शिवसेनेचा सात दिवसांचा अल्टिमेटम! Plight of vegetable market in Bhadravati; Shiv Sena's seven-day ultimatum!

जावेद शेख भद्रावती:-
भद्रावती शहरातील नगर परिषदेकडून भाड्याने घेतलेल्या भाजी मार्केट परिसराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. येथील रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा झालेली असून, कोणतेही मालवाहू वाहन आत प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच लाईटची सोय नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. परिणामी, विक्रेते व नागरिक दोघांनाही दररोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Plight of vegetable market in Bhadravati; Shiv Sena's seven-day ultimatum!
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने नगर परिषद भद्रावतीच्या मुख्याधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

या निवेदनात भाजी मार्केटमधील रस्ते तातडीने दुरुस्त करणे, योग्य लाईट व्यवस्था आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय सात दिवसांच्या आत करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

या निवेदन प्रसंगी शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक दीप गारघाटे तसेच इतर शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भद्रावती शहरातील सामान्य जनतेच्या हक्काच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment