चंद्रपूर : चंद्रपूर जिल्यातील चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य प्रवेश दारासमोर ऊर्जा क्षेत्राचे खाजकीकरण, महाराष्ट्रात समांतर वीज परवाना देण्याचे तसेच जल वीज केंद्रांचे खासगीकरण या केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात एक दिवसाचा संप करण्यात आला. संयुक्त कृती समिती ने पुकारलेल्या संपात कामगार संघटनांनी दिनांक ९ जुलै पासून २४ तासांचा संप करण्यात आला.
संपूर्ण चंद्रपूर व ऊर्जानगर परिसरात पाऊसाची बॅटिंग सुरू असतांना चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वारावर कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत खाजगीकरणाच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनात कुठलाही प्रकारचा हिंसक व वादग्रस्त भाषण करण्यात आलेलं नाही. आंदोलनामुळे वीज उत्पादनात कुठलाही परिणाम झाला नसला, तरी हा देशव्यापी संप यशस्वी करण्याकरिता सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या तिन्ही संघटनांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले व या विरोध प्रदर्शनाची नोंद चंद्रपूर प्रशासनाने नोंदवून घेतली आहे. महानिर्मिती मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करताना संघटनांचे अधिकारी व कर्मचारी धरणे आंदोलन करिता उपस्थित होते.
यावेळी सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे संघटनेचे पदाधिकारी नितीन काळे, राहुल कीर्तने, प्रशांत सोनवणे, हर्षल डोंगरे, हर्षद पद्मावार, विशाल अंभोरे, हेमंत पवार, विशाल फिसके, विपुल वानखेडे, कांचन वावरे,सुनील तिवारी, सूरज सुरजुसे, रवींद्र धांडे, स्वप्निल ठाकरे, गणेश लहाने व इतर सभासद बंधू व भगिनी पूर्ण क्षमतेने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी गौतम रामटेके, नरेंद्र डोंगरे, अमर वानखेडे पंकज दवाळे, प्रभाकर वाघमारे, हेमंत ढोले, निलेश गजभिये, राजेश मगरे, चेतन वानखेडे, रुपेश उमरे,सचिन गायकवाड,गजानन तायडे, शर्मिला मुनघाटे मॅडम, ज्योत्स्ना निममडे, चंदा रोडे, एकता मेश्राम, शितल मेश्राम, वैशाली धनविजय, शितल गोंडाणे, चेतना गजभिये, संदिप मेश्राम, पवन पुडके, प्रशांत अवथरे, राहुल आर्डे, शंकर दरेकर, खेमदेव कन्नमावर, प्रशांत आठवले, तुषार बारापात्रे, हेमंत पाटील, हेमंत पवार यांचे सह महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी विजय भोयर, व इतर सभासद उपस्थित होते. संप संपल्यानंतर उपस्थीत कर्मचाऱ्यांचे, तसेच मुख्य अभियंता व चंद्रपूर प्रशासनाचे व सुरक्षा विभागाचे आभार व्यक्त करण्यात आले.
0 comments:
Post a Comment