जावेद शेख भद्रावती :-
भद्रावती नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या केसुरली ते भद्रावती हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे अत्यंत खराब झाला असून पावसाळ्यात तो चिखलाने भरलेला आहे.त्यामुळे येथील गावकरी तथा विद्यार्थ्यांना रहदारीस त्रास सहन करावा लागत आहे.
Repair the Kesurli to Bhadravati road.
त्याचप्रमाणे या परिसरात अनेक ठिकाणी गौण खनिजासाठी उत्खनन करण्यात आल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. ते पावसाळ्यात पाण्याने पूर्णपणे भरलेले आहेत. या खड्ड्यांमुळे गावातील मुलांना तथा पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सदर रस्त्याचे मजबुतीकरण करून तो रहदारीस योग्य करावा तसेच परिसरातील खड्ड्यांचे पुनर्भरण करून खड्डे बुजवावे व रस्त्यावर होत असलेली अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी केसुरली येथील गावकऱ्यांनी भद्रावती येथील तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून केली आहे.
0 comments:
Post a Comment