जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
एका गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनावर कारवाई करीत वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.illegal sand transportation.
Revenue Department takes action against hyva truck involved in illegal sand transportation.
सदर कारवाई शहरातील टप्पा परिसरातील पिपराडे सभागृह परिसरात गुलमोहर पार्क जवळ महसूल विभागाच्या गौण खनिज विशेष पथकातर्फे दिनांक बारा रोज शनिवारला पहाटेच्या 3.45 वाजेदरम्यान करण्यात आली. एम एच 33 44 85 या क्रमांकाच्या हायवा वाहना तर्फे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. सदर हायवा हा चंद्रपूर येथील प्रदीप तुराणकर यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार मधुकर काळे, मंडळ अधिकारी अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी खुशाल मस्के यांनी केली.
0 comments:
Post a Comment