Ads

भद्रावती शिवाजीनगर येथे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस.

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
भद्रावती शहरातील शिवाजीनगर येथे जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जादूटोण्याचे साहित्य जप्त केले व अज्ञात आरोपीविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत तक्रारदाखल केला आहे.witchcraft
A form of witchcraft was exposed in Bhadravati Shivajinagar.
शिवाजीनगर येथे मोहम्मद शाहिद अब्दुल रज्जाक हे इसम राहतात. आज सकाळी त्यांची सून नेहा यांनी दार उघडले असता दरवाजासमोर अंगणात कापलेले लिंबू, त्यावर हळद कुंकू, खिळे, विलायची, रक्षा, लवंग असे पूजेचे साहित्य कोणीतरी अज्ञात इसमाने टाकल्याचे लक्षात आले. त्यांनी सदर प्रकाराची तक्रार भद्रावती पोलिसात केल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्व साहित्य जप्त केले व अज्ञात आरोपी विरुद्ध बातमी लिहून पर्यंत गुन्हा दाखल झालेल्या नव्हता घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment