सादिक थैम :-वरोरा तालुक्यातील शेगाव बुजरूक येथील एका मुलाने आपल्या वडिलांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडिलांशी शेती च्या वादावरून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. Murder
शेगाव येथे विठ्ठल मंदिराच्या जवळ गुलाब दातारकर यांचे घर आहे. आज १९ जुलै रोज शनिवारला सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान सदर घटना घडली. घटनेत मृत्यू पावलेले गुलाब पत्रुजी दातारकर वय ६५ यांना अर्धांगवायू झाला असल्याने घरीच राहतात. घटनेच्या वेळी तेसकाळी गुलाब पत्राची दातारकर हे झोपाळ्यात झोपलेल्या नातीला झोके देत होते. यांचा मुलगा अभय याने आज सकाळी वडीलाच्या डोके व तोंडावर कुऱ्हाडीने वार केले. यामुळे वडिल घटनास्थळीच मृत पावले.
यावेळेस आरोपी अभयची पत्नी घराबाहेर भांडे घासत होती तर आई शेतात काम करण्यास गेली होती.
दातारकर यांच्याकडे बरीच शेती होती. परंतु मुलास दारूचे व्यसन होते. आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी तो शेती विकू लागला. त्यामुळे आता त्याचे कडे फारच कमी शेती शिल्लक आहे. शिवाय अभयचे मानसिक संतुलन बिघडलेले असून तो नेहमी पत्नी व आईकडे दारूसाठी पैशाची मागणी करत असे अशी माहिती आहे. यावरून त्यांच्यात नेहमी भांडण होत असल्याची माहिती आहे. आरोपी अभय यास दोन लहान मुली आहेत.
आज सकाळी आई शेतावर तर पत्नी घराच्या बाहेर भांडे घासत असताना अभयने आपल्या वडिलांच्या डोके व तोंडावर कुऱ्हाडीने वार केला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याने वडिलांच्या शरीरावर इतरही ठिकाणी कुऱ्हाडीने घाव घातले. मात्र घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली हे सांगणे कठीण आहे.
समोरच्या खोलीत वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना आरोपी अभय मात्र मागील खोलीत शांतपणे जेवत होता अशी माहिती आहे.
घटनेची माहिती पत्नीने पोलीस स्टेशनला देताच शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपी मुलगा अभय यास अटक केली असून पोस्टमार्टम साठी शेव वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शेगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे.
0 comments:
Post a Comment