Ads

वन्य प्राण्यांची शिकार करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर च्या ताब्यात

चंद्रपुर :-दिनांक १८ जुलै, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीत रेल्वे क्रॉसींग ब्रम्हपुरी-आरमोरी रोडवर सापळा रचुन मोपेड वाहनावर वन्य प्राण्यांचे शिकार करुन चोरटी वाहतुक करणारे आरोपी (१) कुंदनसिंग शेरसिंग भुराणी वय ३१ वर्ष, (२) विजयसिंग सुरतसिंग भुराणी वय २१ वर्ष दोन्ही रा. पेठ वार्ड ब्रम्हपुरी यांना पकडुन
Two accused of hunting wild animals in custody of Local Crime Branch, Chandrapur
त्यांचे ताब्यातील शिकार केलेले वन्य प्राणि ०३ मृत जंगली डुक्कर, एक भरमार बंदुक (अग्नीशस्त्र), दारुगोळा व इतर वस्तु सह नमुद दोन्ही आरोपींविरुध्द वन्य प्राणि संरक्षण अधिनियम आणि शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करणे कामी वन विभाग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोअं. गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे, प्रदीप मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment