Ads

राजुरा तालुक्यात 01 ऑगस्ट़ ते 07 ऑगस्ट 2025 दरम्यान "महसूल सप्ताह" ची सुरुवात आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत होणार...

राजुरा– महाराष्ट्र शासन, महसूल विभागाच्या शासन आदेशानुसार व मा.महसूलमंत्री यांचे निर्देशानुसार दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी "महसूल दिन" साजरा करण्यात येणार असून, दिनांक 01ऑगस्ट़ ते 07 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यात "महसूल सप्ताह 2025" विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जाणार आहे.
त्याअनुषंगाने, राजुरा तहसील कार्यालयात देखील महसूल सप्ताह साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार श्री. डाँ. ओमप्रकाश गोंड यांनी दिली.
"Revenue Week" will begin in Rajura Taluka from 01st August to 07th August 2025 in the presence of MLA Devrao Bhongale.....
महसूल सप्ताहाची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी "महसूल दिन" "Revenue Day"साजरा होणार असून, मा. आमदार महोदय, राजुरा विधानसभा क्षेत्र यांचे उपस्थितीत दिनांक 1 ऑगस्ट, 2025 रोजी, सकाळी 11.00 वाजता, उपविभागीय कार्यालय, राजुरा येथील सभागृहात महसूल दिन कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. तसेच 1/8/2025 ला सर्व कार्यालयीन कर्मचारी / अधिकारीयांची आरोग्य़ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 02 ऑगस्ट 2025 रोजी उपविभागीय कार्यालय स्तरावर तहसिलदार, राजुरा/कोरपना/जिवती, उप अधिक्षक भुमी अभिलेख राजुरा/कोरपना/जिवती, गट विकास अधिकारी, राजुरा/कोरपना/जिवती, मुख्याधिकारी, नगर परिषद/नगर पंचायत, राजुरा/कोरपना/जिवती/गडचांदुर यांचे सोबत मा. उपविभागीय अधिकारी, राजुरा यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 2 ऑगस्ट, 2025 रोजी, दुपारी 12.00 वाजता, उपविभागीय कार्यालय, राजुरा येथील सभागृहात अतिक्रमण नियमानुकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टेवाटपासंदर्भातील आढावा घेण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमित जागांचे पट्टे वाटपा संदर्भातील प्राप्त प्रस्तांवावर चर्चा करण्यात येणार आहे.


दिनांक 3 ऑगस्ट़ 2025 रोजी, सकाळी 10.00 वाजता, राजुरा तालुक्यातील चनाखा, विहीरगांव, वरुर, सोंडो, चुनाळा, माथरा, सिर्सी आणि साखरवाही गावामध्ये पांदन रस्ता व दुर्तफा झाडे लावण्याचा कार्यक्रम मा. सरपंच / उपसंरपच यांचे उपस्थितीत घेण्यात येणार आहे.
तसेच राजुरातालुक्यातील प्रत्येक मंडळातील गावा-गावामध्ये पांदन रस्ता व दुर्तफा झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.

दिनांक 4 ऑगस्ट़ 2025 रोजी, सकाळी 9.45 वाजेपासुन ते संध्या. 6.15 वाजेपर्यंत राजुरा तालुक्यातील राजुरा मंडळातील राजुरा, विरुर मंडळातील विरुरस्टेशन, देवाडा मंडळातील देवाडा व गोवरी मंडळातील गोवरी या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. महसूल विभागाअतंर्गत देण्यात येणारे विविध दाखले आणि योजनांचा लाभ नागरीकांना देण्यात येईल.

दिनांक 5 ऑगस्ट़ 2025 रोजी, सकाळी 9.45 वाजेपासुन ते संध्या. 6.15 वाजेपर्यंत राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द, पांढरपौनी, विहीरगाव, विरुरस्टेशन, चुनाळा येथे विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी पोर्टलवर आधार व्ह़ॅलिडेशन न झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी भेटी देवून आधार व्ह़ॅलिडेशन व आधार मॅपिंग करण्याबाबत सुचना देऊन पंचनामा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

06 ऑगस्ट रोजी राजुरा तालुक्यात शासकीय जमिनींवरील अतिक्रमण व शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत तक्रारी प्राप्त असल्यास त्या निकाली काढून अतिक्रमणे निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे

महसूल सप्ताहाचा समारोप दि.07 ऑगस्ट रोजी होणार असून, त्या दिवशी M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नविन मानक कार्यप्रणालीप्रमाणे SOP प्रमाणे धोरणाची माहिती मोठया प्रमाणात प्रसिध्दी करण्यात येत आहे.

या संपूर्ण सप्ताहात राजुरा तहसील कार्यालयामार्फत हेल्पडेस्क, WhatsApp माहिती सेवा, माहितीपत्रके आणि स्थानिक माध्यमांद्वारे जनतेपर्यंत महसूल विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक दिवशी आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील आणि कोतवाल यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे.

तहसीलदार राजुरा श्री.डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी सर्व नागरिकांना या महसूल सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, महसूल विभाग आणि शासनाच्या योजना व सेवा यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सांगितले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment