राजुरा १ ऑगस्ट :-
ब्रह्मकमळ ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती हिमालयावर १३ ते १७ हजार फुटांवर पहावयास मिळते. ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव सॉसुरिया ऑबव्हलाटा हे आहे. भारतात डचमन्स पाईप कॅक्टस या निवडुंग प्रजातीत येते. हे एक दुर्मिळ आणि पवित्र फुल मानले जाते. ते वर्षातून फक्त एकदाच फुलते, सहसा रात्री आणि ते फक्त एक रात्र टिकते वटवाघुळ आणि पतंग यांसारख्या परागकणांना आकर्षित करण्यासाठी हे फुल तीव्र सुगंध निर्माण करते.
Brahma lotus bloomed at Sunita Narendra Deshkar's house.
राजुरा येथील गडी वार्ड ,महादेव मंदिराच्या जवळ असणारे नरेंद्र किसनराव देशकर यांची पत्नी सुनिता आणि मुलगी प्रियल यांनाही झाडांचा खुप छंद आहे. त्यांच्या घरी विवीध प्रजातीचे फुल, फळ, शो चे झाडं मोठ्याप्रमाणात आहेत. त्यातच दिनांक ३१ जुलै ला रात्रौ फुललेल्या ब्रह्मकमळने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हे फुल वर्षातून एकदाच फुलते व एकच रात्र टिकते हे विषेश. या वनस्पतींची पाने आणि फुले औषधी कारणासाठी वापरली जातात. हे एक निशाचर फुलांचे रोप आहे. आयुर्वेदिक औषधात ब्रह्मकमळाचा मोठा उपयोग आहे. ही वनस्पती त्याच्या औषधी गुणधर्मांसह ताप फ्लू आणि इतर आजारांवर उपचार करते. त्वचेचे विकार बरे होण्यापासून ते आतड्यासंबंधीच्या आजारापर्यंत हे काम करते. नरेंद्र देशकर हे वनविभागात कामं करतात. त्यामुळें वृक्ष, वन, वनस्पती, पशू पक्षी प्राणी याविषयी आत्मीयता आहे. घरातील सर्वच व्यक्ती वृक्ष संवर्धनासाठी सातत्याने कार्य करीत आहेत. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे देशकर हे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुद्धा आहेत.सुनिता नरेंद्र देशकर, गृहिणी
माझे पती वनविभागात कार्यरत आहेत. त्यामुळें स्वाभाविकच कुटुंबीयांना पण वृक्ष लागवड, पशू पक्षी प्राणी, बाग, बगीचे याविषयी आम्हाला पण आवड निर्माण झाली. आम्ही सर्वांनी काल अतीशय दुर्मिळ ब्रम्हकमळ फुल उगवतानाचां अविस्मरणीय क्षण अनुभवला. अनेक पालेभाज्या,फळ, फूल, औषधी वनस्पती आमच्या घरी आहेत. परंतु वर्षातून फक्त एकदाच एकाच रात्री टिकणारे ब्रह्मकमळ फुल बघून आम्ही खूपच आनंदी आहोत. जणूकाही पर्यावरण संवर्धनाची निसर्गाने दिलेली ही एक अनमोल भेटच आहे.
---------------------------------------------
0 comments:
Post a Comment