पाथरी (ता. सावली) :
पाथरी पोलिसांनी मौजा निमगाव येथे जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना रंगेहाथ पकडत 2 लाख 20 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 16 ऑगस्ट रोजी दुपारी ठाणेदार सपोनि. नितेश डोर्लीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
Police raid on gambling den in Nimgaon
मुखबिरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपी अतुल भांडेकर (रा. गडचिरोली), लोमेश राजगडे, ज्ञानेश्वर साहारे, दुर्याधन मुद्दमवार, कृणाल भडके, सागर ताडुलवार, गुरुदास ढोले, नरेंद्र बोरुले, अरविंद चिमुस्कर, देवनाथ झाडे व मुखरु नागापुरे असे एकूण अकरा जण जुगार खेळताना आढळले.
त्यांच्याकडून रोख रक्कम 75 हजार 770 रुपये व चार दुचाकी वाहने मिळून 2 लाख 20 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे व उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोहवा खेलेश कोरे, पोअ. गिरिधर आंबोरकर, मेघश्याम गायकवाड, अमित म्हस्के, किरण भगत, श्रीराम बोदलकर व विकेश वनस्कर यांचा समावेश होता.
0 comments:
Post a Comment