सिंदेवाही / प्रशांत गेडाम:-
सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथील नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास घडली.
Two 16-year-old boys drown while swimming
मृत मुलांची नावे –🔹जीत टीकाराम वाकडे (१६, रा. सिंदेवाही)🔹आयुष दीपक गोपाले (१६, रा. सिंदेवाही)
काल (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानंतर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेला सुट्टी असल्याने हे दोन्ही मित्र फेरफटका मारण्यासाठी व पोहण्यासाठी टेकरी गावाजवळील नदीवर गेले होते. मात्र, पोहत असताना दोघांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
0 comments:
Post a Comment