चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी एका समाजसेविकेच्या मदतीने मुक्ती कॉलनी, मच्छीनाला लगत इंडस्ट्रियल एरिया परिसरातील एका घरात चोरीछुपे सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पर्दाफाश केला असून मुख्य आरोपी अमर शशिकांत द्विवेदी (वय ३१) यासह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई १९ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
Prostitution in a house in Mukti Colony; A woman along with the main accused arrested
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, संबंधित घरात महिलांकडून गुप्तपणे देहव्यवसाय करून घेतला जात आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष निम्भोरकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी स्वप्नील सुरेश वाढई (वय २५) यास बनावट ग्राहक बनवून घरात पाठवले. त्याने मोबाईलवर मिस कॉल करून देहव्यवसाय सुरू असल्याची खात्री दिल्यानंतर पोलिसांनी छापा मारून ३१ वर्षीय महिला व मुख्य आरोपीस ताब्यात घेतले.
बनावट ग्राहक घरात पोहोचल्यावर आरोपीने त्याला काही महिला दाखवल्या. ग्राहकाने एक महिला निवडल्यावर तिला वेगळ्या खोलीत पाठवण्यात आले. तेव्हा ग्राहक बनलेल्या वाढई याने मोबाईलवर मिस कॉल देऊन पोलिसांना इशारा केला आणि पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
आरोपींकडून १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल, २ हजार रुपये रोख रक्कम, कंडोम आदी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी ग्राहकाकडून २ हजार रुपये घेत असे, त्यातील अर्धे पैसे तो महिलेला देत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत पोलिस कर्मचारी धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, चेतन गज्जलवार, प्रफुल गारघाटे, सुमीत बर्डे, विजयमाला वाघमारे, छाया निकोडे, निराशा तितरे, अर्पणा मानकर, उषा लेडांगे यांनी सहभाग नोंदविला. तसेच काही समाजसेवी महिलांचा पंच म्हणून समावेश करण्यात आला होता.
---
0 comments:
Post a Comment