Ads

भद्रावती पोलिसांची कारवाई : धारदार तलवारीसह आरोपी ताब्यात

भद्रावती प्रतिनिधी(जावेद शेख )–
भद्रावती पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पंचशिल नगर येथील राजमहल बार जवळ धारदार लोखंडी तलवारीसह दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे.crime news
Bhadravati police action: Accused arrested with sharp sword
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.00 ते 3.45 वाजताच्या सुमारास पंचशिल नगर परिसरात आरोपी अमीत ओमप्रकाश टेभुर्ने (वय 25, रा. राहूल नगर, पंचशिल वार्ड, भद्रावती) हा तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान किंमत अंदाजे ₹2,500/- ची एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. तलवारीवर “जय शिवाजी जय महाराष्ट्र” असे शब्द कोरलेले  आहे.

या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र. 443/2025, कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. गजानन तुपकर, सफौ. महेंद्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकुलवार, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आदींच्या पथकाने केली.

👉 भद्रावती पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली दहशतीची भीती कमी झाली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment