भद्रावती (प्रतिनिधी जावेद शेख):-
भद्रावती तालुक्यातील मुधोली गावात ११ वर्षीय अल्पवयीन बालीकेवर ४२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
42-year-old man rapes minor girl; Accused arrested
मिळालेल्या माहितीनुसार, गोपीचंद आत्राम (वय ४२, रा. मुधोली) याने अल्पवयीन बालीकेवर अत्याचार केला. घटनेच्या वेळी पीडितेचे आईवडील शेतात कामासाठी गेलेले असल्याने ती घरी एकटी होती. ही संधी साधून आरोपीने तिच्या घरात घुसून अत्याचार केला.
संध्याकाळी आईवडील घरी आल्यानंतर मुलीने त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तातडीने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय केदारे व पीएसआय मुळे करीत आहेत.
0 comments:
Post a Comment