चिमूर / प्रतिनिधी:-
चिमूर तालुक्यातील मौजा कन्हाळगाव येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा चिमूर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली. पोलिसांनी चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ₹१,४०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
House burglary case in Kanhalgaon solved in just two days – accused arrested, goods worth 1.40 lakh seized
घटना तपशील
दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रारदार रामदास वाघमारे हे पत्नीसमवेत शेतावर कामासाठी गेले होते. संध्याकाळी परतल्यावर त्यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा दिसला. कपाट तपासल्यावर सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेलेली असल्याचे लक्षात आले. यावरून पोलीस स्टेशन चिमूर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी अटकेत
गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी रोशन बबन वाघमारे (३३), रा. कन्हाळगाव यास अटक केली. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेले दागिने व नगदी हस्तगत करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
गुन्हे शोध पथकातील सफौ विलास निमगडे, पोअं रोहीत तुमसरे, सचिन खामनगर, सोनु, सचिन साठे यांनी ही धडक कामगिरी केली.
0 comments:
Post a Comment