Ads

🚨 Mephedrone ड्रग्ससह दोन आरोपी अटक

Two accused arrested with Mephedrone drugs
चंद्रपूर / प्रतिनिधी :-
चंद्रपूर शहरात अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत Mephedrone (एम.डी.) ड्रग्ससह वाहने, मोबाईल व धारदार हत्यार असा एकूण ₹१,७४,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

📌 पकडलेले आरोपी
1. चुन्नु महेश गुप्ता (१९ वर्षे), रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर
2. हर्षित अशीत टिकदार (२० वर्षे), रा. बाबुपेठ वार्ड, चंद्रपूर
दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुदेव चौक, बाबुपेठ परिसरात सापळा रचून आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४.४५० ग्रॅम Mephedrone ड्रग्स, दोन वाहने, धारदार चाकू व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

📌 गुन्हा नोंद
या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ५८३/२०२५ नोंदविण्यात आला असून आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्ट व भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई सुरू आहे. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
यामध्ये सपोनि श्री. दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री. बलराम झाडोकार, पोउपनि श्री. संतोष निंभोरकर, पोउपनि श्री. विनोद भुरले, पोउपनि श्री. सर्वेश बेलसरे, सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे, चापोअं मिलिंद टेकाम आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.


---

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment