जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :-
एका 38 वर्षीय महिलेने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरातच पंख्याला दोराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तीन रोज रविवारला तालुक्यातील मुरसा येथे घडली. Suicide
38-year-old woman commits suicide by hanging.
पिंकी मोरेश्वर कोडापे, वय 38 वर्ष, राहणार मुरसा असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सदर महिलेवर कर्ज असल्यामुळे ती सतत चिंतेत राहायची. घटनेच्या दिवशी पती शेतावर गेल्याची संधी साधून तिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. तिच्या मागे एक मुलगा व एक मुलगी आहे. भद्रावती पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल केला असून एपीआय केदारे यांचे मार्गदर्शनातपुढील तपास पोलीसकरीत आहे.
0 comments:
Post a Comment