सचिन पाटील/ प्रतिनिधी :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र राज्यसभेचे उपसभापती रिपब्लिकन पक्षाचे झुंझार नेते स्मृतीशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमिताने मागील दोन वर्षांपासून विविध स्पर्धा,उपक्रम,कार्यक्रम आणि व्याख्यानमाला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती चंद्रपुर च्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.
२५ सप्टेंबर २०२५ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची शंभरावी जयंती चंद्रपूर ह्या त्यांच्या जन्मगावी भव्य दिव्य प्रमाणात व्हावी या करीत नियोजन बैठक स्मृतीशेष श्याम खोब्रागडे यांच्या जयंतीतिदिनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसरात समितीचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि समितीचे कार्याध्यक्ष देशक खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत.संपन्न झाली.बैठकीत बौद्ध बिहारचे प्रतिनिधी,महिला मंडळाच्या सदस्या,सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांच्या आयोजनांबद्दल सूचना मांडल्या.जनशताब्दी कार्यक्रम दोन दिवस २४,२५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचे ठरले.बॅरिस्टर साहेबांच्या जीवनावर संदर्भ पुस्तिका बनविण्यात येणार आहे तसेच जयंती निमित्ताने स्मरणिकेचे सुद्धा प्रकाशन करण्यात येणार आहे .सोबतच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर,बॅरिस्टर साहेबांसोबत कार्य केलेले लोकांना प्रमुख वक्ते म्हणून पाचारण करण्याचे सर्वानुमते ठरले सोबतच बुद्ध भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे या सभेत ठरले.यावेळी प्रामुख्याने समितीचे उपाध्यक्ष अशोक निमगडे महासचिव किशोर सवाने, कोषाध्यक्ष केशव रामटेके,निमंत्रक प्रतीक डोर्लीकर,विशालचंद्र अलोने,रमेश जीवने,सुरेश नारनवरे,धर्मेश निकोसे,अशोक टेंभरे,अनंत बाभरे,राजकुमार जवादे यांची उपस्थिती होती.या प्रसंगी राजाभाऊ खोब्रागडे,डॉ. टी. डी कोसे.डॉ विद्याधर बनसोड,प्रा नितीन रामटेके,शंकर वेल्हेकर,हरिदास देवगडे,बाजीराव उंदिरवाडे ,महादेव कांबळे,दिलीप डांगे,भाऊराव दुर्योधन,सुभाष शेंद्रे,रुपेश वालकोंडे,ज्योती शिवणकर,डॉ.उषा खोब्रागडे,शिल्पा कांबळे,संघमित्रा खोब्रागडे यांनी सूचना मांडल्या.सभेमध्ये सत्यजित खोब्रागडे, भीमलाल साव,मुन्ना खोब्रागडे प्रेरणा करमरकर,ज्योती सहारे ममता कांबळे,विजय करमरकर,सुनील आवळे,जमनदास मोटघरे,भास्कर बुजाडे,डी.पी.शिंदे,अनिल खोब्रागडे,ध्रुव करमरकर,प्रज्योत बोरकर,पौषणा बेताल,चारिका भगत यांच्यासह अनेक महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment