भद्रावती (प्रतिनिधी जावेद शेख):
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) दुपारी सुमारे बारा वाजता कारवाई करत अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवलेली बिअर जप्त केली.
Large stock of illegally stored beer seized in Chandankheda
ही कारवाई कबीर मुस्तफा पठाण (वय ४०, रा. चंदनखेडा) यांच्या घरावर छापा टाकून करण्यात आली. छाप्यामध्ये घरातील समोरच्या खोलीत ठेवलेल्या फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. यामध्ये हायवर्ड बिअरच्या ९६ बाटल्या, ट्युबर्ग बिअरच्या ९० बाटल्या व काजबर्ग बिअरच्या ९० बाटल्यांचा समावेश आहे. एकूण २७६ बिअर बाटल्यांची किंमत तब्बल ४९ हजार ३७० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा वरोरा उपविभागाच्या पथकाने भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१४/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम (E) अन्वये नोंदविला आहे.
ही कारवाई चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पीएसआय बेलसरे, हवलदार सचिन, संतोष, गणेश तसेच पोलीस शिपाई शशांक बदामवर व मिलींद यांच्या पथकाने केली.
👉 या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment