चंद्रपूर : अमली पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करताना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. आरोपीकडून एम.डी. (Mephedrone) ड्रग्ससह मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ₹१,०३,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Accused arrested with M.D. drugs – Chandrapur Local Crime Branch action
ही कारवाई १८ ऑगस्ट २०२५ रोजी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे सरकार नगर परिसरात सापळा रचण्यात आला. दरम्यान, मोटारसायकल क्रमांक MH34-BN-0752 ला थांबवून चालकाची झडती घेतली असता सौरभ दुर्वास कसारे (वय २४, रा. मेजर गेट, वैद्यनगर, चंद्रपूर) याच्या ताब्यात ६.०६ ग्रॅम Mephedrone Drug आढळून आला.
यासह मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण १.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद (क्रमांक ६७५/२०२५) करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. सर्वेश बेलसरे, पोहवा. नितीन साळवे, नितीन कुरेकर, दिपक डोंगरे, प्रमोद कोटनाके व पोअं. अमोल सावे यांचा समावेश होता.
0 comments:
Post a Comment