Ads

नवरगाव येथे महसूल सप्ताहातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर उत्साहात पार पडले.

सिंदेवाही-- सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव मंडळ येथे दि 04 ऑगस्ट सोमवार ला दुपारी 12 वाजता महसूल सप्ताहातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर उत्साहात पार पडले.
The Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Abhiyan Camp during the Revenue Week was held with enthusiasm at Nawargaon.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. याशिवाय तहसीलदार संदीप पानमंद, गट विकास अधिकारी आत्मज मोरे, पोलीस निरीक्षक कांचन पांडे, उपविभागीय अभियंता बाळू षटगोपमवार, तालुका कृषी अधिकारी संजय कोसूरकर, सहकार सहायक निबंधक मंगेश बोरकर, महावितरण चे उपविभागीय अभियंता गायधने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विनोद सुरपाम, गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे, तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमाकांत लोधे, नवरगाव चे सरपंच राहुल बोडणे, पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील व ईतर शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना सदर शिबिराचे महत्त्व व उद्देश सांगून जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेणे बाबत आवाहन तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले. शिबिरात नवरगाव मंडळ भागातील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्यात आले. सदर शिबिरात महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती व त्यांनी विविध स्टॉलवर भेट देऊन माहिती जाणून घेतली. या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला. महसूल विषयक तक्रारींचे निवारण करण्यात आले आणि अनेक लोकांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रेही मिळाली.नागरिकांना महसूल विषयक तक्रारींचे निवारण, शेत जमिनींचे उतारे, प्रमाणपत्रे, वारस नोंद, नकाशे, पी एम किसान, अग्रीस्टॅक, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, राष्ट्रीयत्व, रहिवाशी दाखले, संजय गांधी निराधार योजना, जिवंत सातबारा आणि इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महसूल विभागांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शिबीर यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार रणजित देशमुख, मंगेश तुमराम, सविता मडावी, निरीक्षण अधिकारी शरद लोखंडे, मंडळ अधिकारी रोशनी कोल्हे, तलाठी, कोतवाल यांनी विशेष प्रयत्न केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment