चंद्रपूर (५ ऑगस्ट) – शहरातील महाकाली कॉलरी, आनंदनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध मोहा दारूच्या अड्ड्यावर चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत आठ महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत ₹१,४१,४६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.illegal liquo
Police raid illegal liquor den in Mahakali Colliery – 8 women arrested, valuables worth Rs 1.41 lakh seized
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी पंच, वजनमाप अधिकारी व फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत आनंदनगर परिसरात छापा टाकला.
छाप्यात मोहा दारू, मोहा सडवा, देशी दारूच्या बाटल्या आणि दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण ₹१,४१,४६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये:
मोहा दारू – ४८५ लिटर (किंमत ₹३३,९५०/-) मोहा सडवा – १२८० लिटर (किंमत ₹६४,०००/-)
दारू बनवण्याचे साहित्य₹४२,१५०/-
देशी दारूच्या ९० एम.एल. च्या ३४ बाटल्या – किंमत ₹१,३६०/-
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –लक्ष्मी अशोक दहागावकर, कांता प्रकाश चापडे, छाया शंकर दुर्गे, तुळशी दीपक मेश्राम, शशीकला त्रिमोहन बुटले, माया लक्ष्मण दुर्गे, मोनिका विजय दुर्गे आणि सुशिला मुरलीधर ठाकरे.
सदर प्रकरणात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, तसेच पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पौ.उपनिरीक्षक मनिष तालेवार, वैभव चव्हाण, भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, ईमरान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, मल्लेश नरगेवार, सरिका गौरकार, दीपिका झिंगरे आदींच्या पथकाने केली.
0 comments:
Post a Comment