भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :- महसूल दिनाचे औचित्य साधून सज्जा चोरा येथील महसूल सेवक सुरज शेंडे यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री करण देवतळे यांचे हस्ते तहसील कार्यालयामार्फत सन्मान करण्यात आला .
Revenue Employee Suraj Shende honored on Revenue Day
तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते पुष्प्गुगुच्छ , शाल , श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . कोतवाल म्हणून नियुक्ती झाल्यापासून चोरा येथील महसूल सेवक (कोतवाल )सुरज शेंडे यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने आपली जबाबदारी पार पडली आहे . गावपातळीवरील शासकीय योजना राबविणे , विविध निवडणुकांचे कामकाज , आपत्ती व्यवस्थापन तसेच महसूल प्रकरणांमध्ये प्रशासनाला आवश्यक माहिती वेळोवेळी पुरविणे अशा विविध कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे .या कार्यक्रमास नायब तहसीलदार मधुकर काळे ,सुधीर खांडरे, मनोज आकनूरवार , मंडळ अधिकारी तसेच तहसिल कार्यालयातील अधिकारी सर्व तलाठी व कर्मचारी उपस्थित होते .पमहसूल दिनी झलेला हा सन्मान सर्व महसूल सेवकांसाठी प्रेरणादायी ठरला .
0 comments:
Post a Comment