Ads

कास्ट्राईब महासंघाच्या वतीने सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार यांचा सत्कार

जावेद शेख भद्रावती :-  कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्याचे पंचेचाळीसावे वाषीॅक अधिवेशन जवाहर विदयाथीॅगृह, सिव्हिल लाईन्स नागपूर येथे घेण्यात आले.
On behalf of the Castrib Federation, Dr. Banduakanurwar, Group VI Development Officer, was felicitated.
  या अधिवेशनाचे उद्घाटन आशा पठाण (भाप्रसे ) सहसचिव,मुख्य मंत्रि सचिवालय तथा महासंचालक वनामती नागपूर यांनी केले.अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अँड कृष्णा इंगळे होते.प्रमुख अतिथी अनुसूचित जाती जमाती आयोग मराठे उपाध्यक्ष अँड धर्मपाल मेश्राम, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे (भावसे),महसचिव सुरेश तांबे,कार्याध्यश गणेश मडावी,कार्याध्यश (शिक्षण) बि.डी.धुरंधर,सरचिटणीस प्रभाकर सोनडवले, सुमीत भुईगड,जिल्ह्य अध्यक्ष मोरेेश्वर बारसागडे,अशोक राऊत व बत्तीस संवर्ग निहाय संघटना राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.प्रथम कास्ट्राईब महासंघ उद्घाटन देशातील बहुजन व मागासवर्गीय थोर विभुतीना पुष्पहार व दिव्पप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथीनी मार्गदर्शन केले.पदोन्नतीतील मागासवर्गीयांचे आरक्षण व इतर प्रलंबित समस्यांबाबत सभेत ठराव मंजूर करून शासनाला निवेदन देण्यात आले.अधिवेशनात गुणवंत अधिकारी/कर्मचारी,सामाजिक कार्य  व संघटनाचे कार्याबद्दल पंचायत समिती भद्रावतीचे सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार यांचा शिल्ड,प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
   डॉ.बंडु आकनुरवार यांनी ग्रामीण विकास, समाज,सामाजिक व संघटनेच्या कार्य केल्याबद्दल कास्ट्राईब महासंघाच्या वतीने गुणगौरव केल्याबद्दल पंचायत समिती गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, कास्ट्राईब महासंघ जिल्ह्यध्यक्ष मोरेश्वर बारसागडे,अशोक राऊत, कालीदास वाळके,संजिव पाझारे,मेघराज उपरे,प्रेमानंद नगराळे,मिलींद कवाडे,इंजि.राजकन्या ताकसांडे,भास्कर रामटेके यांनी अभिनंदन केले.अधिवेशनात राज्यातुन हजारो शिक्षक, कर्मचारी,पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment