गोंडपिंपरी :
पोलीस ठाणे गोंडपिपरी हद्दीतील मौजा करंजी येथे गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण १२ गोवंश जनावरे व एक पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
12 cattle and pick-up seized during blockade at Mauja Karanji
गोंडपिपरी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, करंजी परिसरातून एका पिकअप वाहनाद्वारे गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी नेली जाणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मौजा करंजी येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित पिकअप (क्र. MH34-BZ-6550) वाहन दिसताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता वाहनचालक वाहन न थांबवता पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करताच चालकाने दुबागुडा जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
वाहनाची तपासणी केली असता त्यात १२ गोवंश जनावरे दाटीवाटीने बांधलेली आढळली. त्यापैकी ४ जनावरे मरण पावलेली होती. गोवंश जनावरांची किंमत सुमारे १ लाख ८५ हजार रुपये असून वाहनाची किंमत अंदाजे ४ लाख रुपये आहे. एकूण ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी मूल श्री. सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक खुशाल टेकाम, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कदम, व गायकवाड यांनी संयुक्तपणे केली आहे.
🔹 गोंडपिपरी पोलिसांच्या दक्षतेमुळे अवैध गोवंश वाहतूक रोखण्यात यश!
---
0 comments:
Post a Comment