गडचांदूर :
दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी गडचांदूर पोलिसांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे वरझडी शेतशिवारात धाड टाकून दोन इसमांकडून एकूण 2 किलो 11 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. crime news
Gadchandur police take bold action - 2 kg 11 grams of ganja seized, two accused arrested
अटक आरोपींची नावे अशी —
1. इरफान सय्यद इस्माईल, रा. लक्ष्मी टॉकीज जवळ, गडचांदूर
2. अनिल जगेराव आडे, रा. बैलमपुर
मुखबिराच्या खबरीवरून पोलीस पथकाने वरझडी शेतशिवारात सापळा रचून आरोपींना झाडाखाली संशयास्पदरीत्या थांबलेले पाहिले. चौकशी करताच दोघेही समर्पक उत्तर देऊ न शकल्याने पंचासमक्ष परिसराची झडती घेण्यात आली. झाडाखाली आढळलेल्या पॉपटी रंगाच्या गाठोड्यात हिरव्या रंगाची पाने, फुले व बोंडे स्वरूपातील गांजा सापडला. पंचासमक्ष वजन केल्यावर त्याचे एकूण वजन 2 किलो 11 ग्रॅम आढळले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींवर अंमली पदार्थ नियंत्रण अधिनियम 1985 च्या कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोउपनि पंकज हेकाड व डि.बी. पथकातील कर्मचारी — शितल बोरकर, बलवंत शर्मा, प्रकाश बाजगीर, सुरज ढोले, मनोहर जाधव, साईनाथ उपरे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment