Ads

'वादग्रस्त दुभाजक'आयुक्तांना ‘अप-मानपत्र’ देऊन मनपातील महा-भ्रष्ट्र अधिकाऱ्यांचा ‘जाहीर धुत्कार’ “

चंद्रपूर, दि. 12 नोव्हेंबर —
बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्ता दुभाजकाच्या कामातील प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज जनविकास सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना “अप-मानपत्र” देऊन मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा “जाहीर धुत्कार” केला.“Controversial Divider”
A ‘Letter of Disapproval’ handed to the Commissioner — Public Condemnation of the Extremely Corrupt Officials in the Municipal Corporation.
जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने दुपारी 4 वाजता आयुक्त विद्या गायकवाड यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना 'अप-मानपत्र' दिले. मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर धुत्कार करत असल्याचे यावेळी त्यांनी आयुक्तांसमोर नमूद केले.  देशमुख यांनी मनपाचे सहायक अभियंता आशिष भारती यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पाहणीचा अहवाल आयुक्त गायकवाड यांना दिला. आयुक्तांना अपमानपत्र देत, दुभाजकाच्या कामात त्वरित चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी अक्षय येरगुडे, मनीषा बोबडे देवरा हटवार इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी काल, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मनपाचे सहाय्यक अभियंता आशिष भारती यांच्या उपस्थितीत बागला चौकातील दुभाजकाच्या कामाचे प्रत्यक्ष मोजमाप केले. तांत्रिक उपकरण, वजन काटा,टेप इत्यादी साहित्य घेऊन कामाच्या अंदाजपत्रकांनुसार स्पॉट पंचनामा केला. यावेळी साहित्याच्या प्रमाणात मोठ्या तफावती आढळल्या. अंदाजपत्रकात दाखवलेले स्टील, सिमेंट, व वृक्षलागवडीचे प्रमाण वास्तवापेक्षा तीनपट वाढवून दाखवले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुभाजकाची लांबी आणि खर्च कृत्रिमरीत्या वाढवून 3.56 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे पुरावे सादर करण्यात आले. या सर्व घोटाळ्याचा सारांश 'अप-मानपत्रा'मध्ये दिला आहे.

देशमुख यांनी या गैरव्यवहाराचे पुरावे मनपाच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करून देखील कारवाई न झाल्याचा आरोप केला. उलट मनपा प्रशासन तकलादू कारणे देऊन भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराचे संरक्षण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचा ‘अपमानपत्र देऊन जाहीर धुत्कार’ करत निषेध नोंदवला.

या आंदोलनामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून शहरभर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

असे कसे अंदाजपत्रक ?

बागल चौक व सावरकर चौक व सावरकर चौकातील दुभाजक तोडून एकूण 1800 मीटरचे अंदाजपत्रक मनपाचे अधिकाऱ्यांनी नवीन दुभाजकासाठी तयार केले. त्यामध्ये बागला चौकातील दुभाजकाची लांबी 1000 मीटर दाखवण्यात आली. मनपा अभियंत्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मोजल्यानंतर नंतर ही लांबी 510 मीटर निघाली. अंदाजपत्रकामध्ये काही प्रमाणात अधिकची क्वांटिटी घेतल्या जाते. त्यामुळे 600 मीटर पेक्षा जास्त ही लांबी असायला नको. अंदाजपत्रक बनवताना 400 मीटरची तफावत दिसते. या ठिकाणी वापरलेल्या लोखंडी सळाखींचे देशमुख यांनी वजन काटा व टेप घेऊन मोजमाप केले. सर्व हिशेब काढल्यानंतर संपूर्ण दुभाजकासाठी 100 ते 125 क्विंटल पेक्षा जास्त स्टील लागायला नको. अंदाजपत्रकामध्ये 390 क्विंटल स्टीलची देण्यात आली. सावरकर चौकातील दुभाजकाची लांबी विचारात घेतल्यास एकूण कामाची 1300-1400 मीटर लांबी होते. या दुभाजकावर दोन फूटच्या  रुंदीचे(बॅग साईज) चे 660 पामच्या झाडांचा तसेच एक फूट बॅग साइज असलेल्या 7500 चाफ्याच्या झाडाचा समावेश आहे. दोन्ही मिळून या साईजचे 2000 पेक्षा जास्त झाडे लावणे शक्य नाही.असे अव्वाच्या सव्वा प्रमाण वाढवून अंदाजपत्रका तयार करण्यात आले.

दुभाजकाच्या देखभालीसाठी 57 लक्ष रुपये वार्षिक खर्च

 या दुभाजकाच्या देखभालीसाठी वर्षाला 57 लक्ष रूपये खर्च अंदाजपत्रकामध्ये नमूद आहे. एकीकडे शहरातील 88 बगीचे,8 डिवाइडर व 13 सौंदर्यकरणाचे स्थळ यांची देखभाल करण्यासाठी मनपा एका कंत्राटदाराला वर्षाला केवळ एक कोटी म्हणजे महिन्याला आठ लाख रुपये देते. तर बागला चौकातील एका दुभाजकाच्या देखभालीसाठी मनपा वर्षाला 57 लाख रुपये म्हणजे महिन्याला जवळपास पाच लाख रुपये मे. सूर्यवंशी एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देणार आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment