चंद्रपूर, दि. १० नोव्हेंबर २०२५ –
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने गोवंश तस्करीवर मोठी कारवाई करत एक पिकअप वाहनासह एकूण ₹६,७०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तेलंगाना येथे कत्तलीसाठी अवैधरित्या नेत असलेली १७ जनावरे (गौवंश) वाचवण्यात आली आहेत.
Action taken against four people for illegally transporting cattle
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा बेंबाळ (ता. मुल) येथे नाकाबंदी केली. या दरम्यान पिकअप वाहन (क्र. MH34-CQ-0694) मध्ये दाटीने व निर्दयतेने भरलेली ५ जनावरे आढळली, तर वाहनाखाली १२ जनावरे बांधलेली आढळली. एकूण १७ जनावरांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणात आरोपी –
१. समर्थ नागेश पुप्पलवार (वय २१, रा. बेंबाळ),
२. स्वप्निल फुलझेले (रा. एरगाव),
३. मुन्ना शामराव मुद्रिक (रा. बेंबाळ),
४. अशपाक कुरेश व
५. रहमान कुरेश (रा. गोंडपिपरी)
यांच्याविरुद्ध मुल पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा क्रमांक ४८८/२०२५ नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोउपनि श्री. विनोद भुरले, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र महतो, पोअ. प्रदीप मडावी, अजीत शेन्डे, प्रफुल्ल गारघाटे व नितेश महात्मे यांचा समावेश होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गोवंश तस्करीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
0 comments:
Post a Comment