Ads

चार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मनसे महिलासेनाची मागणी

चंद्रपूर : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महिला व लहान मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिच्यावर दगड टाकून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.
MNS Mahila Sena demands death penalty for the accused in the case of abusing a four-year-old child
या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध करत मनसेच्या महिलासेना बल्लारपूर तालुकाध्यक्षा कल्पना पोर्तलावार यांनी आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेले निवेदन पोलीस अधीक्षकांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, “राज्यात महिलांवरील अत्याचार सातत्याने वाढत आहेत. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. डोंगराळे येथील चिमुकलीवरील बलात्कार व निर्घृण हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला तातडीने फाशी देऊन सामाजिक दहशतीला कलाटणी द्यावी. अन्यथा मनसे महिला सेना आक्रमक आंदोलन उभारेल.”

हे निवेदन मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री. हेमंतभाऊ गडकरी, मनसेचे चंद्रपूर जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात देण्यात आले. या प्रसंगी मनसे महिलासेनेच्या बल्लारपूर तालुकाध्यक्षा कल्पना पोर्तलावार, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे कुलदिप चंदनखेडे यांच्यासह अश्विनीताई खोके, शुभांगीताई काकडे, आशाताई गोधडी, इंद्रताई काढताडे, सुकेशनीताई निमकर तसेच मनसेचे कार्यकर्ते व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment