पोंभुर्णा, ता. 20 नोव्हेंबर 2025 –
मा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालय, पोंभुर्णा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम 14 नोव्हेंबर – चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या बालक दिन सप्ताह व बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत घेण्यात आला.
Awareness program at Pombhurna under Children's Day Week and Child Marriage Free India Campaign
कार्यक्रमाला जनता विद्यालयातील प्राचार्य श्री. ए. बी. बघेल, श्री. आर. ए. सावसाकडे, श्रीमती एस. एस. गोहणे तसेच श्री. ए. डी. माथणकर यांची उपस्थिती लाभली.
या जनजागृती उपक्रमात चाईल्ड हेल्पलाइन 1098 मधील किरण बोहरा (केस वर्कर) आणि सखी वन स्टॉप सेंटरमधील राणी खडसे (केस वर्कर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2005, POCSO कायदा 2012, चाईल्ड हेल्पलाइन 1098, महिला हेल्पलाइन 181, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या कार्यप्रणाली व उपयुक्ततेची माहिती देण्यात आली.
तसेच 10वी नंतरचे वय, त्यातील भावनिक बदल, चुकीच्या निर्णयांमुळे होणारे धोके व भविष्यात त्याचे जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत वास्तव केसमधील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत त्यांनी कोणतेही असे कृत्य करू नये ज्यामुळे त्यांचे आयुष्य संकटात येईल, असे आवाहन करण्यात आले.
अशा प्रकारे पोंभुर्णा येथे जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
0 comments:
Post a Comment